Pune : महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी औषध फवारणी

एमपीसी न्यूज – कै. बा. स. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रविवारी ठिकठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड, कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली.

डॉ. नायडू हॉस्पिटल अंतर्गत व बाह्य परिसर, कौंसिल हॉल परिसर, अंजुमन शाळा व वसतिगृह, लग्न हॉल, बी. के. प्राईड सोसायटी, बुधन वाडी, किराड वाडा आणि नजीकचा परिसरातही औषध फवारणी करण्यात आली, असे क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे यांनी सांगितले.

सणस मैदान येथील विलगिकरण कक्षाच्या इमारतीच्या परिसरातही सोडीयम हायपोक्लाराईड फवारणी करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नाना पेठ, उर्दू शाळा, नायडू हॉस्पिटल, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातर्फे प्रभाग क्र. २९ मधील लोकमान्य नगर, शिवाजी रोड, शास्त्री रोड, बाजीराव रोड, दांडेकर पूल, पर्वती गाव, पर्वती दर्शन, आंबील ओढा, सणस ग्राउंड संपूर्ण परिसर, हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत भाजी मंडई, सोलापूर हाईवे, हडपसर संपुर्ण गावठाण परिसर, पी.एम.टी. गाडीतळ परिसर, हडपसर पोलीस चौकी या ठिकाणीही महापालिकेने औषध फवारणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.