Pune : हिंदू धर्माचे विकृतीकरण थांबवा – डॉ. विश्वंभर चौधरी 

एमपीसी न्यूज – युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी (Pune) स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी संपादित केलेल्या ‘सत्याग्रही विचारधारा’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन  बुधवार,दि.8 नोव्हेंबर रोजी,सायंकाळी 6 वाजता गांधी भवन(कोथरूड)येथे झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांच्याहस्ते प्रकाशन झाले .महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या अंकाच्या ई -आवृत्तीचे प्रकाशन प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले.

यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे विश्वस्त डॉ शिवाजीराव कदम, प्रा एम एस जाधव, अन्वर राजन, जांबुवंत मनोहर, डॉ प्रवीण सप्तर्षी, अरुण खोरे, ज्ञानेश्वर मोळक,अभय देशपांडे, संदीप बर्वे, नीलम पंडित आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ विश्वंभर चौधरी म्हणाले,’ सत्याग्रही दिवाळी अंक सर्वांगसुंदर आहे. मोदी पर्वाचा आढावा चांगल्या पध्दतीने घेतला आहे. ‘ निर्भय बनो ‘ हा गांधीजींनी दिलेला नारा आहे. डॉ. कुमार सप्तर्षी हे आद्य निर्भय व्यक्तीमत्व आहेत.

Pune : आत्महत्या करणे हा मराठा आरक्षण मिळवण्याचा मार्ग नाही – प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

भाजपच्या आय टी सेल वर धाड टाकून कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकारने धाडस दाखवले,  हे महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र सरकारने हे धाडस दाखवायला हवे होते. हिंदू धर्माचे, सणांचे डीजेकरण, विकृतीकरण केले जात आहे, ही चिंतेची गोष्ट आहे.

इतिहास संपवणे चालू आहे. त्या विरुद्ध लढा दिला पाहिजे. काँग्रेस ने गांधी, नेहरू, पटेल लोकांपर्यंत पोहोचविणारी फौज तयार केली पाहिजे. गांधीजींची उणीव कधी नाही इतकी आज भारताला, जगाला भासत आहे.

बौद्धिक मागासांसाठी आरक्षण ठेवायची वेळ आली तर ती सनातन वाल्यांना  द्यावे लागेल. भाजप, संघपरिवाराविरुद्ध लढायचे असेल तर धोरण, शस्त्रे बदलावी लागेल, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना प्रा.मिलिंद जोशी म्हणाले,’दिवाळी अंकामुळे साहित्य निर्मितीला वाव मिळाला. वेगवेगळे प्रवाहांचे स्वागत प्रथम दिवाळी अंकात झाले. दिवाळी अंकात ग्रामीण भागातील लेखक मोठे योगदान देत आहेत. या अंकांची गुणवत्ता टिकवणे हे आव्हान आहे.

दिवाळी अंकांना मदत करणे हे समाजातील धनिकाना सांस्कृतिक कर्तव्य वाटत नाही, यावर विचार झाला पाहिजे, समाजातील सहिष्णुता टिकली पाहिजे, तत्वनिष्ठ लेखनाला वाव मिळाला पाहिजे, संवेदनशीलता टिकवून ठेवले पाहिजे,असेही ते म्हणाले.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ सत्य प्रत्येकाच्या मनात दडलेले असते. मते न मिळवता पक्ष फोडणे आणि सत्तेत राहणे हा लोकशाहीचा, मतदारांचा अपमान आहे.

‘ पंतप्रधान मोदी  उलट सुलट वक्तव्य करीत असून त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे. धान्य वाटण्या साठी 80 कोटी भारतीय गरीब का ठेवले जातात, असा प्रश्न त्यांनी विचारला.

हिंदू धर्मातील सर्व चांगल्या गोष्टी मोदींच्या काळात संपविल्या जात आहेत. सर्व आघाड्यांवर मोदी अपयशी ठरले आहेत,  त्यांना भारतात अनेक चांगले पर्याय असून, त्यांच्याहून चांगला पंतप्रधान भारताला (Pune) मिळू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.