Pune : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पथनाट्य

एमपीसी न्यूज – येत्या 5 जानेवारीला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले (Pune)आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे.
यानिमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज ठीक ठिकाणी सत्यशोधक च्या टीम मार्फत पथनाट्य सादर करण्यात आले.

वारजे भागात सत्यशोधकच्या टीममार्फत सादर करण्यात आलेल्या(Pune) पथनाट्याचा भाग होण्याचे सौभाग्य यावेळी लाभले. वारजे हायवे ब्रिज येथे दुपारच्या वेळी जनजागृती करणारे हे पथनाट्य सादर करण्यात आले.
संपूर्ण सत्यशोधक च्या टीमला शुभेच्छा आणि सुंदर पथनाट्यासाठी मनःपूर्वक आभार मानत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पराग तानाजी ढेणे आणि अर्चना पराग ढेणे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.