Pune: ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – एका अनोळखी इसमाने दुचाकीवरून येत एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून तोडून चोरून नेले. ही घटना आज शनिवारी (दि.27) सकाळी सहाच्या सुमारास शुक्रवार पेठ येथे घडली.

याप्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली असून अनोळखी इसमावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ महिला शुक्रवार पेठेतील मुनिश्रृत भगवान जैन मंदिर रोडवर नाईक वाड्याजवळून पायी जात होत्या. यावेळी एक अनोळखी इसम दुचाकीवरून भरधाव येत महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून चोरून नेले. याप्रकरणी खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.