Pune : शहरात जुलै अखेर 18 हजार कोरोनाचे रुग्ण असतील : महापालिका आयुक्त

The city will have 18,000 corona patients by the end of July: Municipal Commissioner

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. जुलै अखेर कोरोनाचे 18 हजार रुग्ण असतील, असे महापालिका महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

शहरात 112 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 61 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 41 जणांवर उपचार सुरू आहेत. शहरात सध्या कोरोनाचे 12 हजार 474 रुग्ण झाले आहेत.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महापालिकेचे नियोजन सुरू आहे. या रोगामुळे आतापर्यंत 510 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 435 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

यापुढील काळात ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. अशा रुग्णांवर घरीच उपचार घ्यावेत, असा निर्णय घेतला आहे.

ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत आहेत. त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मागील आठवड्यात शहरातील खासगी 16 रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. आता पुढील आठवड्यात देखील आणखी काही रुग्णालये ताब्यात घेण्यात येणार आहेत.

रविवारी तब्बल 620 कोरोनाचे रुग्ण नव्याने आढळले. तर, कोरोनाच्या आजरातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याची गरज नाही. वेळीच उपचार आणि काळजी घेतल्यास हा आजार सुद्धा बरा होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.