BNR-HDR-TOP-Mobile

Pune : तलावात पोहोताना डोके फरशीवर आदळले; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

829
PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज- जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा तलावाच्या तळाशी असलेल्या फरशीवर डोके अपटल्याने मृत्यू झाला. पुण्यातील वडगाव शेरी भागातील एका सोसायटीच्या जलतरण तलावात ही घटना घडली. 
शाम नितीशकुमार कालरीया (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे.
शाम हा मूळचा अहमदाबाद येथील आहे. काही महिन्यांपूर्वी तो पुण्यात आला होता. संगणक अभियंता म्हणून तो एका कंपनीत काम करत होता. वडगाव शेरी येथील हरमेश हेरिटेज या सोसायटीत तो मित्रांसोबत राहत होता. या सोसायटीच्या आवारात एक छोटा जलतरण तलाव आहे. मित्रांसोबत तो तलावात पोहण्यास उतरला होता.
  • दरम्यान जलतरण तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याचे त्याच्या लक्षात आले नसावे. त्याने तलावात सूर मारली आणि तळाशी असलेल्या फरशीवर त्याचे डोके आपटले.
गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर मागील 10 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी दिली.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3