Pune : पुणेकरांची प्रतीक्षा संपली ! ; असा असेल स्वारगेट ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग

एमपीसी न्यूज- येत्या काही काळात पुणेकरणाच्या सेवेत मेट्रो येत आहे.मेट्रो मार्गाचे काम पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात वेगाने सुरु झाले आहे. या मार्गातील सर्वात अवघड टप्पा म्हणजे शिवाजी नगर ते स्वारगेट हा पाच किमी लांबीचा भुयारी मार्ग. हा भुयारी मार्ग नेमका कसा असेल, त्याचे काम कसे करण्यात येईल, त्याची स्थानके कशी असतील याची माहिती देणारा व्हिडीओ महामेट्रोकडून नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

पुणे शहरात मेट्रो येणार आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणार या कल्पनेनेच पुणेकर सुखावत आहेत. कारण बंद पडलेल्या पीएमटी , कार्यकरत नसलेले सिग्नल आणि त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेले पुणेकर हे चित्र आता पुण्याला नवीन नाही. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक यंत्रणेवर विश्वास राहिला नाही. या सगळ्यात काहीतरी सुखावणारी गोष्ट म्हणजे येत्या काही काळात पुणेकरणाच्या सेवेत मेट्रो येत आहे. पण हा मेट्रोचा मार्ग कसा असेल याबाबत पुणेकर साशंक होते.

मात्र ,पुणेकरांनो तुम्हाला प्रतीक्षा असलेल्या शिवाजी नगर ते स्वारगेट या पाच किलोमीटर पर्यंतचा भुयारी मार्ग नेमका कसा असेल, त्याचे काम कसे करण्यात येईल, त्याची स्थानके कशी असतील याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या बाबतचा व्हिडीओ महामेट्रोकडून नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

शिवाजीनगर ते स्वारगेट या पाच कि. मी.च्या मेट्रो मार्गात एकूण पाच स्थानके भुयारी आहेत. महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट येथील सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित सर्वेक्षण सुरू झालेले नाही. कसबा पेठेतील 245 बाधित घरांचे मालक सर्वेक्षणास तयार नसल्याने येथील मेट्रो स्टेशनच्या जागेचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे.

दरम्यान, शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो मार्ग नक्की कोठून जाणार, त्यामध्ये नेमकी कोणाची आणि किती घरे बाधित होणार, मिळकती बाधित होणार असतानाही त्याबाबतची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही, असे विविध प्रश्न उपस्थित करून नागरिकांनी सर्वेक्षणास विरोध दर्शविला आहे.

पहा पुणेकरांनो असा असेल तुमचा स्वारगेट ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.