Pune Vaccination News : पुण्यात उद्या फक्त 15 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस

एमपीसीन्यूज : पुणे शहरात उद्या, शनिवारी लसीकरणाची अनेक केंद्र बंद ठेवायची वेळ आली आहे. त्यातही कोव्हॅक्सिनचे फक्त 1500 डोस उपलब्ध असल्याने फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांनाच ही लस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

त्यामुळे पुणे शहरातील 45  वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या एकूण 15  केंद्र उपलब्ध असतील. सर्व केंद्र कोवॅक्सिनचे असतील. 16  एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल. सर्व केंद्रांवरील लस केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असेल. कोणालाही पहिला डोस दिला जाणार नाही” अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

दरम्यान, उद्या लशींचा साठा उपलब्ध न झाल्यास रविवारी आणखी केंद्र बंद ठेवायची वेळ येवु शकते, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.