Vaccination in Pune – 6 ते 11 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा अजूनही राज्य सरकारकडून आदेश नाही

एमपीसी न्यूज : 6 ते 11 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा अजूनही राज्य सरकारकडून आदेश आला नसल्याने त्याचे नियोजन महापालिकेला करणे शक्‍य नाही. या आदेशाची आम्हीही वाट पहात आहोत, अशी माहिती महापालिकेचे लसीकरण (Vaccination in Pune) अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

6 ते 11 वयोगटातील सुमारे 4 लाख पाच हजार मुले शहरात लाभार्थी आहेत. त्यांना को-वॅक्‍सीन लस देण्याला मागील आठवड्यात केंद्राने जाहीर केले. मात्र, अद्याप त्या संदर्भातील आदेश स्थानिक पातळीवर पोहोचले नसल्याने त्याविषयीचे नियोजन या संस्थांना करता आले नाही.

Pimpri News : शहरातील 19 केंद्रांवर सोमवारी होणार लसीकरण

शहराची अंदाजित लोकसंख्या ही 42 लाख इतकी आहे. त्यातील 9.68 टक्के लोकसंख्या ही 6 ते 11 वयोगटातील बालकांची आहे. याबाबतचे निकष केंद्र आणि राज्य सरकारने जारी केले आहेत. जेव्हा लसीकरणाला सुरूवात होईल, तेव्हा महापालिकेच्या शासकीय केंद्रातून (Vaccination in Pune) लस देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.