Sreejit Rameshan : आरटीआय कार्यकर्त्याचा कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप

एमपीसी न्यूज – आमदार आण्णा बनसोडे यांच्या पाठोपाठ माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन (Sreejit Rameshan) यांनीही पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. 

 

श्रीजित रमेशन यांनी सुमारे 38 हजार कोटींची एक हायप्रोफाईल केस पुराव्यांसह तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना सोपविली होती. ते प्रकरण तडीस नेण्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यांकडून तक्रार मागे घेण्याबाबत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रमेशन यांनी केला आहे.

 

या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक व गृह सचिव यांना ई-मेल करीत रमेशन (Sreejit Rameshan) यांनी तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

PCMC Police : स्थानिक पोलीस दखल घेत नाहीत, तर थेट पोलीस आयुक्तांच्या व्हाट्सअपवर करा तक्रार

 

Sreejit Rameshan

रमेशन (Sreejit Rameshan) यांनी कृष्ण प्रकाश यांची भेट घेतली आणि पुराव्यांसह 38 हजार कोटी रुपयांची हायप्रोफाईल केस दिली. कृष्ण प्रकाश यांनी तातडीने दरोडा प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना बोलावून तपासाचे निर्देश दिले. तथापि, दोन महिन्यांनंतर, आरोपीने रमेशन यांना भेटून तक्रार मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर नुकतेच रमेशन यांना संबंधित पोलीस निरीक्षकाने आपल्या कार्यालयात भेटायला बोलावून तक्रार मागे घेण्यास सांगितले, असे रमेशन यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

यासंदर्भात कृष्ण प्रकाश यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. कृष्ण प्रकाश यांची बाजू उपलब्ध होताच ती बातमीत समाविष्ट केली जाईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.