PMC News : महापालिका हद्दीतील 23 गावांचा पाणीपुरवठा अद्यापही वार्‍यावरच..

एमपीसी न्यूज : महापालिका (PMC News) हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश देऊनही अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. गेली दोन आठवडे केवळ सर्व्हेचेच काम सुरू असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेत (PMC News) समावेश झालेल्या 23 गावांमध्ये पाणी देण्याची जबाबदारी आधी ‘पीएमआरडीए’कडे होती. त्यामुळे नवीन बांधकामांना परवानगी देताना ‘पीएमआरडीए’ने पाण्याची सुविधा करण्याची अट घातली होती. मात्र, ही गावे महापालिकेत आल्यानंतर बांधकाम व्यवासायिकांनी हात वर केले आहेत. पालिकेनेही पाणी देण्याची जबाबदारी झटकली.

Vaccination in Pune – 6 ते 11 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा अजूनही राज्य सरकारकडून आदेश नाही

त्यामुळे पाण्याचा प्रश्न न्यायालयात गेला आहे. याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होईपर्यंत टँकरने (PMC News) पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिका प्रशासनाकडून हे पाणी देण्याबाबत केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. गेली दोन आठवडे केवळ सर्व्हे करण्याचेच काम सुरू असल्याचे समोर आले आहे.

Pimpri Field Office : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी जनसंवाद सभा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.