Pune : मित्राबरोबर सिनेमा पाहायला गेलेल्या पत्नीला पतीकडून सिनेमागृहाच्या आवारातच चोप

एमपीसी न्यूज- पतीला न सांगता मित्राबरोबर गुपचुप सिनेमा पाहायला जाणे एका पत्नीला चांगलेच महागात पडले. तिच्या पतीला हे कळताच त्याने थेट सिनेमागृह गाठून तिला सिनेमागृहाच्या आवारातच चोप दिला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक 29 वर्षीय विवाहित महिला रविवारी दुपारी आयनॉक्स सिनेमागृहात तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. तिने सिनेमाची तिकीटे देखील काढली. पण सिनेमा सुरु व्हायच्या आधीच विवाहित महिलेचा पती त्याठिकाणी आला व तिच्याकडे संबंधित मित्राबाबतची विचारपूस केली.

तिच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली. शेवटी सिनेमागृहातील कर्मचार्‍यांनी पोलिसांना बोलावून तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सर्वांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांची समजूत घालून बोळवण केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.