Pune News : पुण्यातील तरूणाची शिरवळमध्ये गोळ्या झाडून हत्या

एमपीसी न्यूज : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची शिरवळ येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. संजय पाटोळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिरवळ येथील निरा नदी काठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

 

 या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, संजय पाटोळे हे शिरवळ मधील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात देण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खुनाचे नेमके कारण आणि मारेकरी कोण हे मात्र अद्याप निष्पन्न झाले नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.