India Corona Update: देशात दोन लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट 1.93 टक्के 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. मागील काही दिवसांपासून नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी झाली असून, बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटून दोन लाख झाली आहे. तसेच, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.93 टक्के एवढा झाला आहे. 

 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 16 हजार 051 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 37 हजार 901 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 28 लाख 38 हजार 524 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 21 लाख 24 हजार 284 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.33 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्याच्या घडीला 2 लाख 02 हजार 131 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 206 कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आजवर 5 लाख 12 हजार 109 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.
ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 76.01 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 8.31 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 175 कोटी 46 लाख 25 हजार 710 जणांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 7 लाख जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.