Chikhali News:  घरकुलची वाटचाल ‘सोलर सिटी’कडे; इमारतींच्या वीजबिलात होणार बचत

 आमदार महेश लांडगे यांची माहिती

एमपीसी न्यूज – चिखली येथील घरकूल प्रकल्पातील 20 इमारती आता सौर ऊर्जामुळे वीजेच्या बाबत स्वयंपूर्ण होणार आहेत. त्यामुळे वार्षिक वीज बिलात बचत होणार असून, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पुढाकारने घरकूलची वाटचाल आता ‘सोलार सिटी’कडे होत आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

फेडरेशन ऑफ घरकूल आणि शिवतीर्थ प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त घरकूलमधील 20 इमारतींना सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पण आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक नितीन काळजे,  नगरसेवक राहुल जाधव,  कुंदन गायकवाड, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, सरिता नेवाळे, अजय जाधव, संतोष ठाकूर, अजय पाताडे, संदीप नेवाळे, अरुण पाडुळे, संभाजी बालघरे, गणेश यादव,फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष सुधाकर धुरी आदी उपस्थित होते.

माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, घरकूलमधील सांडपाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार महेश लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पुढाकाराने हे मार्गी लावण्यात येणार आहे. कामगार नेते विष्णूपंत नेवाळे म्हणाले की, समाविष्ट गांवातील विकासाला चालना देण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

फेडरेशन ऑफ घरकूलच्या कार्याचे कौतूक…

फेरडेशन ऑफ घरकूलने सामाजिक कार्यात कायम आघाडी घेतली आहे. कोविड काळात गरजू नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप, आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, औषध फवारणी आदी कामांसाठी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेतला. आगामी काळात  संपूर्ण घरकूलमध्ये सर्व सोसायट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक आणि सोलार पॅनल बसवण्याबाबत फेडरेशनने पाठपुरावा केला.

घरकूलच्या इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास सार्वजनिक वीज बिल कमी होईल. सोसायट्यांवर येणारा आर्थिक खर्चाचा बोझा करून अर्थिकदृष्ट्या घरकुलवासीयांना सक्षम करता येईल. फेडरेशन ऑफ घरकूल येथे सर्वांसाठी वडिलधार्‍यांची भूमिका घेते. आणि त्याप्रमाणे माझ्याकडे समस्या घेऊन येत असते. वडीलधारी मंडळी ज्याप्रमाणे कुटुंबाची काळजी घेतात. त्याप्रमाणे हे फेडरेशन ऑफ घरकुल येथे सर्वांच्या अडिअचणीसाठी पाठपुरावा करत असते, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.