_MPC_DIR_MPU_III

Pune : शिवाजीनगरमधील रुग्णांसाठी फिरता दवाखाना : आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती वाढत असताना इतर आरोग्य समस्यांशी झगडणा-या रुग्णांना ओपीडी, दवाखाने, चिकित्सालये बंद असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन शिवाजीनगर मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या संकल्पमधून मतदार संघातील नागरिकांसाठी फिरता दवाखाना हा स्तुत्य उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

यावेळी नगरसेविका निलिमा खाडे व दत्ता खाडे उपस्थित होते. शांतीलाल मुथा, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या मदतीने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्या द्वारे घरोघरी फिरुन रुग्णांना वैद्यकीय मदत व सल्ला दिला जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

लॉकडाउनच्या परिस्थतीत नागरीकांनी घराबाहेर पडणे धोक्याचे आहे. त्यांना सर्व सोयी घरच्या घरी मिळाव्यात यासाठी शिवाजीनगर मतदारसंघातील कार्यकर्ते काम करीत आहेत. विशेषत: वंचित घटकांची गैरसोय होऊ नये, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फिरता दवाखाना सुरु करण्यात आला. मतदार संघातील प्रत्येक भागात तो फिरणार आहे. यामध्ये डॉक्टरांबरोबरच त्यांना प्राथमिक उपचारासाठी आवश्यक साधने व औषधे यांची सोय करण्यात आली असल्याची माहिती या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

शिवाजीनगर मतदार संघात याच पद्धतीचे आणखी फिरते दवाखाने सुरु करण्याची आमची तयारी आहे. या दवाखान्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे सामाजिक जाणीवेतून डॉक्टरांनी मदत करावी. ज्या डॉक्टरांना या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9420477052 या क्रमांकावर संपर्क साधावा. सिद्धार्थ शिरोळे – आमदार, शिवाजीनगर. 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.