Rahul Dravid to be India’s new coach : राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा नवा कोच

एमपीसी न्यूज : आयपीएल स्पर्धेची फायनल संपताच भारतीय क्रिकेटमधील एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं अखेर हेड कोच होण्यासाठी मान्यता दिली आहे. रवी शास्त्रींचा वारसदार म्हणून द्रविडचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं. याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. आयपीएल फायनलच्या दरम्यान द्रविडनं हा प्रस्ताव मान्य केला आहे. द्रविडसोबत सुरूवातीला 2 वर्षांचा करार करण्याच येणार आहे.

राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा हेड कोच होईल. तो लवकरच नॅशनल क्रिकेट अकादमीच्या  संचालक पदाचा राजीनामा देणार आहे.’याबाबत बीसीसीआयनं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अखेर द्रविड कोच होण्यासाठी तयार झाला आहे. या रिपोर्टनुसार विक्रम राठोड बॅटींग कोच म्हणून यापूढेही कायम राहील. तर मुंबईकर पारस म्हांब्रे बॉलिंग कोच म्हणून भरत अरुण यांची जागा घेणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.