Pune News : राहुल गांधी समजून सावरकरांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी केलेल्या एका वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.(Pune News) राज्यभरात आज भाजप आणि शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. पुण्यातही बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. मात्र या आंदोलनादरम्यान शिंदे गटातील एका महिला कार्यकर्त्याकडून एक चूक झाली. या महिलेने राहुल गांधी समजून सावरकरांच्याच फोटोला चप्पल मारण्याचा प्रयत्न केला.

सारसबागे जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर शिंदे गटाने निषेध आंदोलन ठेवले होते. यावेळी शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे, संपर्कप्रमुख अजय बापू भोसले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो असलेला बॅनर आंदोलनासाठी आणण्यात आला होता.

सुरुवातीला काहीवेळ राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर एका महिलेने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला मारण्यासाठी चप्पल हातात घेतली.(Pune news) मात्र शिंदे गटातील इतर पदाधिकाऱ्यांनी वेळीच या महिलेला रोखले.. त्यानंतर मात्र या महिलेने राहुल गांधींच्या फोटोकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यावर चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली..या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय…

Moshi News : उद्योजकांच्या समस्यांबाबत शनिवारी उद्योजक मेळावा; उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थितीत राहणार

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेतल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधींनी सावरकरांबद्दल वक्तव्य केलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा भाजप, मनसे आणि शिंदे गटाकडून निषेध नोंदवला गेला. तसंच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणीही केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.