Vadgaon Maval : वडगावचे पाणी पेटले; पाणी येणार पण श्रेय कुणाचे ?

एमपीसी न्युज – वडगाव मावळ शहरासाठी इंद्रायणी नदीवर जांभूळ येथे जॅकवेल बांधून 200 आणि 300 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनने पाणी आणण्याच्या 40 कोटी रुपयांच्या कामासाठी राज्य शासनाने तांत्रिक मंजुरी दिली. (Vadgaon Maval) हे काम झाल्यानंतर वडगाव शहराला मुबलक पाणी मिळणार हे निश्चित असले तरी हे पाणी नेमके कुणाच्या परिश्रमामुळे आले यावरून आता राजकीय वर्तुळातून श्रेयाचे दावे केले जाऊ लागले आहेत. मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे या दोघांकडून या कामासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला असल्याचे सांगितले जात आहे. मीच पाणी आणले अशी भूमिका दोघांनी घेतल्याने वडगावचे पाणी पेटले आहे.

जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या बंधा-याजवळ जॅकवेल बांधून 300 मि.मी व 200 मी. मी.व्यासाच्या पाईपमधून हे पाणी लिफ्ट करून वडगाव नजिकच्या शिंदे टेकडी व संस्कृती सोसायटीला आणले जाणार आहे. तेथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे असे योजनेचे स्वरूप आहे. तज्ज्ञांकडून पाहणी करून योजनेस हिरवा कंदील दिला आहे. मात्र, आता नागरीकांच्या स्वप्नातील योजना पूर्णत्वास जात असताना यात पूर्णत्वाचे श्रेय कोणाचे? यावरून माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे व विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यामध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.

Pune News : राहूल गांधी समजून सावरकरांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याचा प्रयत्न

विद्यमान आमदार सुनिल शेळके म्हणाले की, कुठल्याही कामाचा प्रस्ताव ते मंजुरीपर्यंचा प्रवास हा मोठा असतो. काही महिने, वर्षे यामध्ये जातात. इस्टिमेंट, डीपीआर ही प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असते. फक्त पत्र देऊन पाच दहा दिवसांत मंजूरी मिळत नाही. (Vadgaon Maval) त्यासाठी सातत्याने  पाठपुरावा करावा लागतो. जसा आम्ही या योजनेसाठी केला आणि त्याचेच फळ म्हणून योजना प्रत्यक्षात येत आहे. मात्र या योजने संदर्भात कोणीही चुकीचा पत्रव्यवहार दाखवून श्रेयावर दावा करणार असेल तर ते निश्चित तोंडघशी पडतील असे मत आमदार सुनील शेळके यांनी एमपीसीन्यूजशी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान दि 2 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मावळ तालुक्यातील विकास कामांना मंजुरी देण्याची मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली आहे (Vadgaon Maval)आणि वडगाव शहरासाठी पाणी योजनेच्या मंजूरीच्या संदर्भात माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय असलेले पत्र प्रसिद्ध करण्यात आले.

श्रेयवादाच्या या लढाईत फायदा मात्र जनतेला होणार आहे. याबाबत नागरिक आनंदी असल्याचे चित्र दिसते आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.