रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pimpri News : वाय.सी.एमच्या अँम्ब्युलन्स चालकांसोबत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे रक्षाबंधन

एमपीसी न्यूज – संबंध महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा श्रावणातील पवित्र असा सण म्हणजे भावा बहिणीचे अतूट नातं असलेला रक्षाबंधन.

राखी हे विश्वासाच प्रतिक आहे, हाच विश्वास मनात ठेवून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरात ज्या कोरोना योध्यांनी व बारा महिने जे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खरंतर कठीण काळातही दिवसरात्र प्रामाणिकरित्या अविरतपणे जे कार्य करत असतात असे सर्वांचे बंधू अँम्ब्युलन्स चालक त्यांच्यासाठी हा आजचा सण त्यांच्या सोबत साजरा करून त्यांचे देखील समाजात एक महत्वाचे स्थान आहे, हे मह्त्त्व पटवून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न युवतींनी केला.रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धतीने वाय. सी. एम हॉस्पिटल या ठिकाणी युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या संकल्पनेतून साजरा केला गेला.

या कार्यक्रमात सुहास पलांडे, नवनाथ वाडेकर, विजय शेळके, रामचंद्र जगताप, गणेश कामथे, सचिन सुतार, नंदकुमार शिखरे, नरेंद्र पाटील, राहुल माटेकर इ.चालकांना राखी बांधून शलाका बनकर, मेहेक इनामदार,शुभदा पवार, भव्यशीला गायकवाड़, मेघना जगताप, वैभवी गावड़े, वैष्णवी जगताप,इ.युवतींनी सहभाग घेतला व हा कार्यक्रम पार पडला.खरचं या धकाधकीच्या काळात मनाला समाधान मिळणे अशक्य पण आज ते मिळाले, असे या युवतींनी सांगितले.

spot_img
Latest news
Related news