Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत भोसरी येथे घडला आहे.

विष्णू राठोड (वय अंदाजे 24, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या पालकांनी मंगळवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधली. त्यातून त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केला. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III