Chakan : लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार

शादी डॉट कॉम वरील नोंदणीने युवतीचे आयुष्य बरबाद

खराबवाडीच्या युवकावर गुन्हा ; चंद्रपूरच्या युवतीची तक्रार

एमपीसी न्यूज – शादी डॉट कॉम या संकेत स्थळावर लग्नासाठी नोंदणी केलेल्या ब्रम्हपुरी ( जि.चंद्रपूर) येथील महाविद्यालयीन 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून खराबवाडी (ता. खेड) येथे बोलवून घेऊन चार दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित पिडीत युवतीने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिच्या तक्रारी वरून खराबवाडी येथील एका 26 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची कागदपत्रे चाकण पोलिसांत आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या बाबतचे अाधिक वृत्त असे कि, चंद्रपूर जिल्ह्यातील एका संबंधित पिडीत महाविद्यालयीन युवतीने लग्न जुळविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शादी डॉट कॉम या संकेत स्थळावर लग्नासाठी नोंदणी केली होती. खराबवाडी ( ता. खेड) येथील एका 26 वर्षीय युवकाने संबंधित युवतीला लग्न करतो असे फोन वर सांगितले. संबंधित युवतीचा संपूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर तिला चाकण जवळील खराबवाडी येथे 17 जून 2018 रोजी बोलवून घेतले. त्यानंतर पिडीत युवतीला मित्राच्या रूमवर नेऊन 17 जून ते 20 जून 2018 दरम्यान तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. संबंधित युवतीने 20 जून रोजी रात्री 11 चे सुमारास त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली व ब्रम्हपुरी ( जि.चंद्रपूर) येथे आपल्या घरी परतली. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तिने या बाबत तक्रार दिली असून तिच्या तक्रारीवरून खर्ब्वादी येथील एका युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांत संबंधित गुन्ह्याची कागदपत्रे ब्रम्हपुरी ( जि.चंद्रपूर) पोलीस ठाण्यातून आल्यानंतर सदरची घटना दाखल करून घेण्यात आली असून संबंधित युवकाचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.