Ravet : सरदार पटेल यांच्या एकतेचा वसा लेवा पाटीदार समाजाने जपला – शंकर जगताप

एमपीसी न्यूज – शहरात नोकरी, व्यवसाय,‍ शिक्षणानिमीत्त वास्तवास (Ravet )असलेल्या लेवा पाटीदार समाजाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला दिलेला एकतेचा संदेश हा एक वसा म्हणून जपला आहे. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात लेवा पाटीदार समाजाचे योगदान असल्याचे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले.

निवृत्ती लॉन्स, रावेत येथे लेवा पाटीदार समाजाचा (Ravet)लेवा जल्लोष “स्नेह एवं सांस्कृतिक मेळावा” पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, एलएमसी ग्रूपचे अध्यक्ष मिलींद चौधरी, सांगवी लेवा पाटीदार मित्र मंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे, पिंपरी चिंचवड भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष नीना खर्चे, डॉ. यतिन भोळे, बहिणाबाई महिला मंडळ अध्यक्ष विजया जंगले, पुरुषोत्तम पिंपळे, कृष्णा खडके, विनोद इंगळे, दिपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे आदी मान्यवरांसह पुण्यातील लेवा बांधव आणि भगिनींनी अत्यंत उत्फुर्तपणे प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, समाजात असलेल्या एकता हिच समाजाचे मोठे बलस्थान आहे. शिक्षण, राजकारण, उद्योग– धंदे, व्यवसाय आदी क्षेत्रांमध्ये समाजाचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. समाजातील कुठलाही व्यक्ती या सर्व गोष्टींपासून वंचित राहणार नाही, याची दखल घेतली जाते, ही अभिमानाची बाब असून सामाजिक – आर्थिक क्षेत्रात समाज अधिक प्रगती करत असल्याचा विश्वास व्यक्त करीत वरिष्ठ मंडळींनी उद्योग व कौशल्ये विकासासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे.

Pimpri : अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी पिंपरीत मोर्चा
सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये, गणेश वंदना (अनुभूति बेबी शोवर गृप), गार्गी चौधरी, सिध्दी चौधरी, शरयु आणि पूर्णा चौधरी (नृत्य), अक्षय कोल्हे, आरुषी पाटील (तबला वादन), मोनीका पाटील (एकपात्री नाटक), बहिणाबाई महिला मंडळ (टाळ पथक, गोंधळ), राज वायकोळे, प्रणव पाटील (मर्दानी खेळ), वंदना ढाके, पर्णिता ढाके, रुपाली नारखेडे (योग सादरीकरण), अथर्व नारखेडे, विवेक नारखेडे (अभंग), कुनिका पाटील, वेदिका पाटील, ज्ञानेश्वरी वायकोळे, खुशी पाटील, देव चौधरी, महिमा भोळे (नृत्य), पूर्वा जंगले (शास्त्रीय नृत्य, भरतनाट्यम), प्रितम तळेले (मिमिक्री), वंदना ढाके, पर्णिता ढाके, प्रदीप नेहते, निलेश इंगळे, बाळकृष्ण चौधरी, निलेश इंगळे, पल्लवी चोपडे, सुनीधी कोळंबे, विनिता कोळंबे, मिलिंद कोळंबे (गायन), स्पृहा राणे (गणपती स्त्रोत) यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष विकास वारके यांनी भ्रातृ मंडळाद्वारे राबविलेल्या विशेष समाजोपयोगी व विद्यार्थी स्नेही उपक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसने जडू नये याकरिता ‘संयम प्रशिक्षण’, मुला- मुलींमध्ये नेतृत्व गुण यावेत, यासाठी उन्हाळी शिबिर, प्रि -वेडिंग फोटोशूट न करण्याबाबतचे अभियान, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वृद्धी उपक्रम, युथ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, करिअर गाईडन्स शिबिरे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प, इंडस्ट्री अकडमी मीट, अत्यंत गरीब व कोरोना व्याधीमुळे वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांना शैक्षणिक वित्त सहाय्य इत्यादी अनेकविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुजा परतणे, प्रा. तिलोत्तमा ब-हाटे, पुनम चौधरी यांनी केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.