Alandi : आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी 500 हून अधिक वारकर्‍यांनी नोंदवला सहभाग

एमपीसी न्यूज – आळंदी येथील श्री देवीदास धर्मशाळा(Alandi) येथे 17 व्या वारकरी अधिवेशनाचे शनिवारी (दि.9) आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी 500 हून अधिक वारकर्‍यांनी त्यांचा सहभाग नोंदवला होता.

हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडले.

यावेळी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद (Alandi )आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात नामवंत संत- महंत, ह.भ.प., धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल’ उत्पादने विकत घेणार नाही असा निर्धार केला.

Pune : लोणावळा -पुणे लोकलच्या वाढीव फेऱ्यांचा मागणीसाठी मनसेचं आंदोलन

यावेळी बोलताना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की,केवळ भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावर आज हिंदु धर्म, हिंदुत्व यांवर आघात होत आहेत. नक्षलवाद, इस्लामी दहशतवाद यांची गंभीर समस्या आपल्यासमोर आहे. संतांनाही जातीत विभागण्याचे षडयंत्र चालू आहेत. हिंदु धर्मावर असलेली विविध संकटे दूर करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला धर्मकार्य करावे लागले आणि धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वारकर्‍यांना लढावे लागेल, असे ही मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रास्ताविक देविदास धर्मशाळेचे ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी केले. या प्रसंगी धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी अधिवेशनात मांडण्यात आलेले ठराव तात्काळ शासन दरबारी पोचवून त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.