Pimpri : अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी पिंपरीत मोर्चा

एमपीसी न्यूज – अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी(Pimpri) राज्यव्यापी बेमुदत बंद सुरु केला आहे. तसेच सोमवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड शहरातील अंगणवाडी सेविकांनी पिंपरी येथे आंदोलन केले. यामध्ये अहिल्यादेवी होळकर चौक ते भाजप कार्यालय मोर्चा काढण्यात आला.

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा मोरवाडी येथील भाजप कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या.

अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्रचे अध्यक्ष नितीन पवार (Pimpri)आणि पिंपरी-चिंचवड प्रमुख शैलजा चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषण आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदींच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका काम करत असतात.

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य

त्यांना अतिशय अल्प मानधन देऊन त्यांची शासनाकडून बोळवण केली जाते. सन 2014 मध्ये अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात 1000 आणि मदतनीस यांच्या मानधनात 500 रुपयांची वाढ करण्यात आली. मागील दहा वर्षात कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी राज्यभर 4 डिसेंबर पासून बेमुदत बंद आंदोलन सुरु केले आहे.

अंगणवाडी सेविकांच्या ग्रॅच्युटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची शासनाने अंमलबजावणी करावी. निकालात म्हटल्यानुसार अंगणवाडी कर्मचारी ही वैधानिक पदे आहेत. त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्यानुषंगाने येणारी वेतनश्रेणी, ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी आदी लाभ मिळावेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन 18 ते 26 हजार रुपये करावे. शासनाने तुटपुंजी वाढ करू नये. वाढत्या महागाईमध्ये ही वाढ कमी पडते. महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांना मानधनात वाढ करावी.

विना योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव महिला व बालविकास मंत्र्यांनी मान्य केला आहे. तो प्रस्ताव सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंजून करून घ्यावा. महापालिकेच्या हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करावे. आहाराचा दर आठ रुपये हा अत्यल्प आहे. त्यामुळे कुपोषण निर्मुलन होण्याऐवजी त्यात वाढ होत आहे. हा दर सर्वसाधारण बालकांसाठी 16 आणि अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा, अशा मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.