Pune news: एप्रिल – ऑक्टोबर 2022 मध्ये मध्य रेल्वेला भाडे-व्यतिरीक्त महसूलाची विक्रमी नोंद

एमपीसी न्यूज : भाडे-व्यतिरीक्त (नॉन-फेअर) महसूल आणि पार्सल महसूलामध्ये मध्य रेल्वेची प्रभावी कामगिरी झाली आहे. भाडे-व्यतिरीक्त महसूलाची ₹ 39.45 कोटी आणि पार्सल महसूलाची ₹ 150.87 कोटी नोंद करण्यात आली आहे.

भाडे-व्यतिरीक्त महसूल
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्य रेल्वेची कामगिरी गतवर्षीच्या याच कालावधीतील ₹ 12.16 कोटीच्या तुलनेत ₹ 39.45 कोटींच्या विक्रमी महसूलासह प्रभावी ठरली आहे, जी 224% ची प्रचंड वाढ दर्शवते.
ऑक्टोबर २०२२ मध्ये केलेले प्रमुख करार
 • बाह्य विनाइल रॅपिंगसाठी पुणे विभागाकडून २ गाड्या (12126/25 आणि 10039/40- ५ रेक) असलेले करार 3 वर्षांसाठी वार्षिक ₹ 25.07 लाख महसूलासह.
 • अंतर्गत जाहिरातीसाठी पुणे विभागाकडून एका ट्रेनचा (12125/26) समावेश असलेला करार 3 वर्षांसाठी वार्षिक ₹ 2.02 लाख महसूलासह.
 • नागपूर विभागाकडून ट्रेन क्रमांक 12120 अजनी- अमरावती एक्स्प्रेसमध्ये अंतर्गत जाहिरातींचा समावेश असलेला करार 3 वर्षांसाठी वार्षिक ₹ 3.94 लाख महसूलासह.

 • 10 रेल डिस्प्ले नेटवर्क (RDN) ₹ 83.78 लाख वार्षिक महसूलासह ई-लिलावाद्वारे करार करण्यात आले.

dehu road news: भारत जोडो यात्रेचे सासवड शिवतीर्थ येथून दूचाकी रॅली देहू रोडमध्ये दाखल

अंतिम टप्प्यातील भाडे-व्यतिरीक्त (नॉन- फेअर) महसूल करार
 • 3 पर्सनल केअर सेंटर (PCC) दादर, ठाणे आणि कल्याण येथे 5 वर्षांसाठी एकत्रित वार्षिक महसूल ₹ 17.73 लाख.
 • ₹ 6.57 लाख वार्षिक महसूलासह 5 वर्षांसाठी नाशिक रोड येथे POD हॉटेल.
 • पुणे स्टेशनवर ₹ 6.93 लाखांच्या वार्षिक महसूलासह ५ वर्षांसाठी औषध दुकान सुरू करणे इ.
पार्सल महसूल
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्ये 3.01 लाख टन पार्सल आणि सामानाच्या वाहतुकीद्वारे ₹150.87 कोटींचा महत्त्वपूर्ण महसूल देखील नोंदवला, त्यापैकी ऑक्टोबर 2022 मध्ये ₹ 21.72 कोटींची नोंदणी झाली.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (ऑक्टोबर पर्यंत), वेळापत्रकानुसार पार्सल ट्रेनच्या 150 फेऱ्यांत ₹ 10.75 कोटी महसूल मिळवले आणि 20 इंडेंट पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेनने ₹ 4.10 कोटी महसूल मिळवले.
सध्या 93 सामान्य द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन (SLR कोच) आणि 15 पार्सल व्हॅन (VP) भाडेतत्त्वावर आहेत, त्यापैकी 26 SLR आणि एक पार्सल व्हॅन (VP) अलीकडेच ई-लिलावाद्वारे भाड्याने देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.