Bhosari News : नेहरुनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्राचे भोसरीत स्थलांतरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नेहरुनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्र (डॉग पाउंड ) गवळी माथा रोड, अनुकुल कंपनी समोर 1 एप्रिल 2022 पासून स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कै.नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी येथील पशुवैद्यकीय विभागामार्फत पाळीव प्राण्यांवर उपचारासाठी नेहरुनगर येथे बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे.

 

येथील प्राणी सुश्रुषा केंद्र (डॉग पाउंड ) गवळी माथा रोड, अनुकुल कंपनी समोर स्थलांतरीत करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी याबाबतची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दगडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.