RSS Pathasanchalan : रा.स्व.संघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात विजयादशमी निम्मिताने पथसंचलन उत्साहात

एमपीसी न्यूज : राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्याने शहरात दि.5 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील( RSS Pathasanchalan) तब्बल 21 ठिकाणी पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेऊन सामूहिकतेचे दर्शन घडविले.

Bhosari crime : भाडेकरूला किरकोळ कारणावरून केली मारहाण, भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देहू, देहूरोड, किवळे, संभाजी नगर, चिखली, निगडी, मोशी, चऱ्होली , आळंदी, संत तुकाराम नगर, कासारवाडी, सांगावी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, चिंचवड, काळेवाडी, वाकड, हिंजवडी, रावेत, आकुर्डी, या भागात सकाळी तर इंद्रायणी नगर, दिघी, भोसरी भागात सायंकाळी नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. (RSS Pathasanchalan) यावेळी हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेऊन सामूहिकतेचे दर्शन घडविले. विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी विविध भागातील संचलनात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फूर्तपणे पुष्पवृष्टी , भारत माता की जय च्या जयघोषात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भव्य स्वागत केले.यावेळी विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.