Sangavi News: डिसेंबरअखेर रोडची कामे पूर्ण होतील – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – शहरातील रोडची कामे डिसेंबरअखेर पूर्ण होतील. सीसीटीव्ही आणि फायबर ऑप्टीकचे काम 3 महिन्यात पूर्ण होईल. शहरातील कचरा उचलणे आणि त्याचे विलगीकरण करणे. कच-याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. झाडांच्या फांद्याची छाटणी प्रभाग स्तरावर करण्यात येईल. महत्वाच्या आणि तातडीचे कामांसाठी तरतूद वर्ग करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

महापालिकेच्या ‘ह’ प्रभागामध्ये स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण, वैद्यकीय, आरोग्य, उद्यान, पशुवैद्यकीय आदी विभागांबाबत नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य व अधिकारी यांच्या समवेत आज बैठक झाली.

प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे,  नगरसदस्या माधवी राजापुरे, सीमा चौगुले, शारदा सोनवणे, ह क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, अशोक भालकर, संदेश चव्हाण, मकरंद निकम, रामदास तांबे, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, सुनिल भागवानी, अजय सुर्यवंशी, बापुसाहेब गायकवाड, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सांगवी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर आदी उपस्थित होते.

मुळानगर झोपडपट्टीतील अनधिकृत नळकनेक्शन बाबत कारवाई करावी. शितोळेनगर ते अहिल्यादेवी चौक भागातील अनधिकृत हातगाड्यांवरील अतिक्रमण कारवाई करण्यात यावी. विद्युत दाहिनीबाबत समस्या सोडवावी. 18 मीटर रस्त्यावरील राडारोडा काढण्यात यावा, आदी सूचना नगरसदस्यांनी केल्या. सांगवी आणि औंध यांना जोडणा-या पूलाचे उद्घाटन लवकर करावे. नागरिकांसाठी तो खुला करावा.

ममतानगर येथील कल्चरल सेंटर आणि प्ले ग्राऊंडचे भूमीपूजन करण्यात यावे. महाराजा हॉटेल ते माकन चौक रस्त्याचे कामकाज पूर्ण करावे. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा होत असून पार्किंगचे योग्य व्यवस्थापन करावे. भुसंपादनाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करावे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. सांगवी येथे सोनाग्राफी आणि एक्स रे चे मशीन उपलब्ध करुन द्यावे. कचरा उचलणा-या कर्मचा-यांची संख्या वाढवावी. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. परस्पर झाडे तोडणा-यांवर कारवाई करावी.

दलदलीच्या भागात डासांचा प्रार्दुभाव कमी व्हावा, यासाठी आरोग्य विभागामार्फत तातडीने कार्यवाही करावी. अधिका-यांनी लोकप्रतिनिधींच्या समस्याबाबत गांभीर्याने विचार करुन त्या त्वरीत सोडवाव्यात,  अशा सूचना महापौर ढोरे यांनी दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.