Sangvi : कोयत्याने वार करत तरुणाला लुटले; लल्या, बल्या अटकेत

एमपीसी न्यूज – दुकानातून घरी जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून पैशांची मागणी केली. पैसे देण्यास तरुणाने नकार दिला असता तिघांनी मिळून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री साडेसातच्या सुमारास सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे घडली.

संजय राजू पातारे (वय 19, रा. आबा काटे चाळ, दापोडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बरकत ऊर्फ लल्या मोहम्मद जमादार (वय 19), अक्षय ऊर्फ बल्या दशरथ शिंदे (वय 18, दोघे रा. पिंपळे गुरव), विशाल जाधव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लल्या आणि बल्या या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यांचे पिंपळे गुरव येथे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी ते दुकानातून घरी जात होते. लल्या आणि बल्या या दोघांनी संजय यांना सृष्टी चौकात अडवले. दोघांनी संजय यांना शिवीगाळ करत पैशांची मागणी केली.

आपल्याकडे दुकानाचे पैसे आहेत. ते देऊ शकत नसल्याचे संजय यांनी सांगितले असता आरोपींनी लोखंडी कोयता आणि चाकू काढून संजय यांना धमकावले. तसेच त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने वार करत जबरदस्तीने खिशातून 1 हजार 200 रुपये काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.