Satara News: साताऱ्यात एकाच दिवशी पाच जणांची आत्महत्या

एमपीसी न्यूज: जिल्ह्यातील विविध भागातील पाच जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एकाच दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.

गणपत कणसे (वय 35. रा. विहे, पाटण), सुमित गायकवाड (वय 28, रा. वडगाव हवेली, कराड), आमोल पाटील (वय 37, रा. सुपने, कराड), अक्षय इंगवले (वय 27, रा. किडगाव, सातारा) आणि पोपट ढेडे (वय 40. रा. वाई, भुईंज) अशी आत्महत्या केलेल्या पाच जणांची नावे आहेत.

दरम्यान, या पाचही जणांनी कौटुंबीक वाद आणि आजारपणामुळे आत्महत्या केल्याचे कारण समोर आले आहे. आत्महत्या केलेले पाचही जण 40 वर्षाच्या आतील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.