Talegaon Dabhade News : धडाकेबाज मुख्याधिकारी सतीश दिघे यांची मालेगाव महापालिकेत उपायुक्तपदी बदली

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे धडाकेबाज मुख्याधिकारी सतीश गणपतराव दिघे यांची राज्य शासनाने मालेगाव महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नेमणूक केली आहे. मागील सहा महिन्यात त्यांनी नगरपरिषद प्रशासन, शहरातील स्वच्छता अभियान तसेच शहरातील महत्त्वाचे रस्ते, भुयारी गटर आदी विकास कामाबाबत धाडसी निर्णय घेऊन विकास कामे मार्गी लावली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी दिघे हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून 9 सप्टेंबर 21 रोजी पासून कामकाज पहात असून गेल्या सहा महिन्यात त्यांनी नगरपरिषद प्रशासन, शहरातील स्वच्छता अभियान तसेच शहरातील महत्त्वाचे रस्ते, भुयारी गटर आदी विकास कामाबाबत धाडसी निर्णय घेऊन विकास कामे मार्गी लावली आहे.

त्यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मोरखळा येथील कचरा डेपोत घनकचरा विलगीकरण, खत निर्मिती आदी बाबत त्यांनी अतिशय सकारात्मक निर्णय घेतले, तर शहरात उद्यान सुधारणा, पाणीपुरवठा, स्टेशन येथील स्मशानभूमी आरोग्य विभागामध्ये18 ठेकेदारामधून एकच ठेका देऊन कामात सुसूत्रता आणली.

तसेच नगरपालीकेमधील कर्मचाऱ्यांमध्ये बचत गट स्थापन करून त्या कामाचा ठेका त्या गटास दिल्याने कार्यालयात ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ झाली. कार्यालयामध्ये व्यर्थ खर्च होऊ नये म्हणून चहापान, पेपर वाचन बंद केले. आधी लहानसान गोष्टीकडे मुख्याधिकारी दिघे यांनी जातीने लक्ष दिले.त्यामुळे दिघे यांनी पदभार स्वीकारताना नगरपरिषदेची आर्थिक स्थिती हलाकीची होती, परंतु आजची आर्थिक स्थिती चांगली केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.