Chinchwad: सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांकरिता कृतिशील विज्ञान कार्यशाळा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सायन्सपार्कमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता 13 ते 18 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीसुट्टीनिमित्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. गमतीशीर व क्रियाशील विज्ञान प्रयोगांची तीन बॅचेसमध्ये कार्यशाळा होणार आहे. 

चिंचवड येथील सायन्सपार्कमध्ये मंगळवार ते रविवार दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत कार्यशाळा होणार आहे. या विद्यार्थी केंद्रीत कार्यशाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक साधन सामग्रीशिवाय कमीतकमी खर्चातील व प्रत्येकाला सहज बनविता येथील. अशा वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित गमतीदार प्रयोग साच्यांची निर्मिती व प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांला स्वत: करुन पाहण्याची संधी मिळणार आहे. या दोन दिवसीय कार्यशाळेत क्रियाशील विज्ञान आणि खगोलशास्त्र या विषयांवरील बॅचमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.

कार्यशाळेदरम्यान गमतीशीररित्या विज्ञानाच्या कृतीसत्रांबरोबरच सायन्स पार्कमधील उपलब्ध विज्ञान प्रदर्शने, तारामंडल आणि 3-डी शो, विज्ञान प्रश्नमंजुषा, दुरबिनीद्वारे आकाशाची ओळख इत्यादी सुविधांचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना तयार केलेले प्रायोगिक साहित्य प्रात्यक्षिकानंतर स्वत:जवळ ठेवता येईल.

कार्यशाळेसंदर्भातील अधिक माहितीसाठी 020-27454050, 7744944333 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच [email protected] संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.