Pimpri News :  पिंपरीत साडेसात तास जल्लोषात मिरवणूक;रहाटणी भागातील गणेश भक्तांनी दिला बाप्पाला निरोप 

एमपीसी न्यूज – ढोल रोहित ताशांच्या गजरात, आकर्शक विद्युत रोषणाई व फुलांनी सजवलेल्या प्रथम निघालेल्या गणपती बाप्पांचे ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात आणि जल्लोषात पिंपरी व रहाटणी भागातील गणेश भक्तांनी शुक्रवारी दिला बाप्पाला निरोप.  येथील मिरवणूक रात्री 12 पर्यंत सुरु होती. तब्बल साडेसात तास चाललेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी कॅम्पातील कराची चौक येथे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.आयुक्त तथा प्रशासक शिखर सिंह व त्यांच्या पत्नी ईशा सिंह, जुने संपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य अधिकारी उदय जरांडे व इतर मनपा अधिकारी यांच्या हस्ते मंडळांचे स्वागत करण्यात आले.

तसेच पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्यावतीनेही कराची चौक येथे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कैलास कदम, महिला अध्यक्ष साई नढे, माजी महापौर कवी चंद भाट, माजी नगरसेविका निगार बारस्कर व इतर पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले.

दुपारी 4.25 वा कराची चौक येथे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका येण्यास सुरुवात झाली. कोहिनूर मित्र मंडळ, रिव्हर रोड ची गणपती विसर्जन मिरवणूक ही सर्वात पहिले दुपारी 4:25 वाजता आली. संध्याकाळी 7 वा च्या नंतर गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका चौकात येण्याचा वेग वाढला. त्यावेळेस चौकाच्या चारही बाजूला लोकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटना, पिंपरी यांच्या गणपती बाप्पाच्या रथाने सर्वांची लक्षवेधले. आकर्षक सुवर्ण मंदिरात गणपती बसवून मिरवणूक काढण्यात आली होती. रथा  समोर संघटनेचे पदाधिकारी व्यापारी ढोल ताशाच्या गजरावर उत्स्फूर्तपणे नाचत होते.

फाईव्ह स्टार मित्र मंडळ व इलेव्हन स्टार मित्र मंडळ यांच्या आकर्षक लोकांचे लक्ष वेधले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.