Shirgaon : ट्रकला पाठीमागून दुसऱ्या ट्रकची धडक, एकाचा मृत्यू एक जण जखमी

एमपीसी न्यूज – समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या (Shirgaon) ट्रकने धडक दिली आहे. या अपघातात एक जण मृत्यू पावला आहे तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.8) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शिरगावच्या हद्दीमध्ये घडला आहे.

Hinjawadi : मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

याप्रकरणी सावरलाल ईश्वरलाल नायक (वय 32 रा.राजस्थान) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ट्रक चालक अजय रमेश मिना (वय 20 रा. राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा ट्रक घेवून पुण्याच्या दिशेने जात होते. आरोपी त्याच्या ताब्यातील ट्रक घेवून जात असताना त्याने फिर्यादीच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये आरोपीच्या ट्रकमध्ये असलेला त्याचा साथीदार रोशनलाल नारायणजी मिना (वय 30 रा. राजस्थान) याचा मृत्यू झाला तर आरोपी देखील किरकोळ जखमी झाला आहे. यावरून शरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Shirgaon)आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.