Alandi New : आळंदी मध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी

एमपीसी न्यूज :  आळंदी मध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. पालिका चौकातील शिव स्मारक आकर्षक अश्या पुष्पांनी सजलेले, शहरात सर्वत्र भगवे झेंडे,सकाळच्या रमणीय वातावरणात शिवज्योतीचे तुळापूर हुन आळंदी येथे आगमन झाले.(Alandi New) सायंकाळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताश्या गजरात,बँड बाजाच्या वाद्यात फटाक्यांच्या अतिषबाजीत, सिंहासनास्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्ररथाची आकर्षक विद्युत रोषणाई सह मिरवणूक अश्या रीतीने तिथीनुसार आळंदी मध्ये एक गाव एक शिवजयंतीचे मोठ्या उत्साहात जल्लोषात आळंदी ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

Pune News : शिवभक्तांच्या अपघात प्रकरणी दोघांना अटक

शिव भक्तांचे आकर्षक अश्या रांगोळीने तद्नंतर अश्वरुढ मावळे,श्री ज्ञानेश्वर विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा ढोल लेझीमच्या खेळा सह ,आळंदी चे सुरसंगम बँड,नगारखाना, वडगांव रासाई चे श्री सिद्धिविनायक ढोलताशा पथकाने, सावंतवाडी चे श्री कृष्ण तरुण मंडळाचे ढोलताशा पथकाने,पुष्प माळांनी सजवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीने व आकर्षक असा सिंहासनास्थ छत्रपती शिवाजी महाराज चित्ररथाने लक्ष वेधून घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.