Shivdurg Series :  शिवदुर्ग भाग 8 – शिवाजी महाराजांचे विश्रामस्थळ ‘किल्ले पट्टा’

एमपीसी न्यूज – नगर जिल्ह्याचे भूषण… किल्ले पट्टा! कळसूबाईच्या रांगेतला अवाढव्य, आडवा तिडवा पसरलेला पण चढायला सोपा असा हा किल्ला. कळसूबाईच्या डोंगर रांगा व हा किल्ला पट्टा परिसर अत्यंत नयनरम्य असा आहे.

1671 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड स्वराज्यात आणला. नोव्हेंबर 1679 मध्ये मोगलांच्या ताब्यात असलेली जालना बाजारपेठ महाराजांनी लुटल्यानंतर मोगल सरदार रणमस्तखान चालून आला. त्यास हुलकावणी देत देत बहिर्जी नाईक यांनी आडवाटेने महाराजांना या किल्ल्यावर आणलं.

महाराज दगदगीमुळे आजारी पडले त्यामुळे या किल्ल्यावर ते महिनाभर विश्रांतीसाठी राहिले, म्हणून या गडास विश्राम गड ही म्हणतात. चला तर मग अशा किल्ल्यावर भटकंती करायला…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.