Pune News : ‘सुबह तक तेरी विकेट लेंगे’ म्हणत एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ‘सुबह तक तेरी विकेट लेंगे’ असे म्हणत त्याला ठार मारण्याची धमकी दिली. कोंढव्यातील मिठानगर परिसरात हा प्रकार घडला. 

याप्रकरणी जुलकर हरून खान (वय 42) यांनी तक्रार दिली असून शाहबाज उर्फ खवल्या, शाहरुख दलाल, सलमान उर्फ लड्डू दूधवाला, मुन्ना आणि त्याच्या आणखी दोन साथीदारा विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मीठा नगर परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. यावेळी वर नमूद केलेले आरोपी त्या ठिकाणी हातात लाकडी दांडके घेऊन आले. यातील आरोपी शाहबाज उर्फ खवल्या याने फिर्यादी यांच्याकडे पाहून “तू मेरे को पहचानता है क्या ? मै इधर का भाई हू, मेरे को डरने का, नही तो बस्ती जलाउंगा” असे म्हणत हातातील लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली, तर इतर आरोपींनी ही त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.