Pune News : रेमडेसिविर इंजेक्शनची 45 हजारात विक्री करणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज : एका रेमडेसिविर इंजेक्शनची 45 हजार रुपये किमतीला विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

याप्रकरणी औषध निरीक्षक श्रुतिका कमलसिंग जाधव (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार भरत पवार आणि देवेंद्र काळूराम चौधरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील देवेंद्र चौधरी याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार पवार याच्या वडिलांना कोरोना झाला होता. त्यासाठी त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणाहून चार रेमडेसिविर इंजेक्शन घेतले होते. यातील एक इंजेक्शन शिल्लक राहिले होते. शिल्लक राहिलेले हे इंजेक्शन त्याने आरोपी देवेंद्र चौधरी याला विक्री करण्यासाठी दिले होते. हेच इंजेक्शन देवेंद्र चौधरी याने पंचेचाळीस हजार रुपये इतक्या किमतीला विक्री केले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.