Pune News : लग्नात दोन लाख रुपये दिले नाही म्हणून विवाहितेचा छळ

पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : लग्नामध्ये दोन लाख रुपये का दिले नाहीत या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरे, दीर, पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 33 वर्षीय विवाहितेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 2015 साली फिर्यादी महिलेचे लग्न झाले होते. लग्न झाले तेव्हापासून फिर्यादी महिलेचा पती, दीर, सासरे भावजई आणि आत्या यांनी वारंवार छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लग्नामध्ये दोन लाख रुपये का दिले नाहीत, फिर्यादीचे स्त्रीधन, तिने स्वतःच्या कमाईने विकत घेतलेले साहित्य आरोपींना

बळकावून तिला वाईट शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.