Shivajirao Adhalrao Patil: शिवसेनेला मोठा धक्का! अखेर आढळराव पाटील एकनाथ शिंदे गटात सामील

 एमपीसी न्यूज: हकालपट्टीच्या वृत्तानंतर कमालीचे दुखवालेले शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावत शिवसेनेला अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. (ShivajiRao AdhalRao Patil) अढळराव पाटील हे शिंदे गटात सामिल झाले असून त्यांची उपनेते पदी निवड करण्यात आली आहे.

 

 

गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडीमुळे आढळराव शिवसेनेत मनाने राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी आज शिंदे गटाच्या बैठकीला लावलेली हजेरी आश्चर्य न वाटणारी आहे. याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारीणी जाहीर केली. विशेष म्हणजे शिंदे यांनी शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नव्या कार्यकारिणीत शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड उपनेतेपदी केली आहे. (ShivajiRao AdhalRao Patil) त्यामुळे आढळरावांनी आपल्या स्वभावाप्रमाणे शिवसेनेत झालेल्या अपमानाचे उट्टे काढले आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिला. तसेच पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचं सांगितलं. आता खरया अर्थाने सत्तेत आलो असून भाजप बरोबर राहून आता जनतेची काम करता येतील असं पाटील म्हणाले.

 

Sinhagad Fort : चार दिवसांपासून रस्त्यावर पडलेली दरड अखेर हटवली

 

 

 

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून 3 जुलै रोजी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीचे वृत्त आले होते. त्यावेळी आढळराव यांनाही काय प्रतिक्रिया द्यावी, हे सूचत नव्हते. त्यानंतर मात्र तातडीने हालचाली करत त्यांची हकालपट्टी मागे घेण्यात आली होती. मात्र, त्या वृत्तामुळे आपली बदनामी झाली. शिवसेनेत माझी काय किंमत आहे, हे मला आता कळलं आहे. आता मी अस्वस्थ झालो आहे. काही दिवसानंतर मी पुढच्या निर्णयाबाबत बघू, असे सूचक वक्तव्येही त्यांनी त्यावेळी केले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.