Sinhagad Fort : चार दिवसांपासून रस्त्यावर पडलेली दरड अखेर हटवली

एमपीसी न्यूज : चार दिवसांपासून सिंहगड घाट (Sinhagad Fort) रस्त्यावर पडून असलेला दरडीचा ढिगारा अखेर वन विभागाने हटविला आहे. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सिंहगड घाट रस्त्यावर गोळेवाडी तपासणी नाक्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पहिल्या मोठ्या वळणावर दरड कोसळली होती.

सुदैवाने त्या दिवसापासूनच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. त्यावेळी तातडीने सदर दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात येईल असे वन विभागाने सांगितले होते. पण ते काम सुरु झाले नाही.

sangvi Garbage: जुन्या सांगवीतील घाणीचे साम्राज्य दूर

17 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड हटविले आहेत. त्यामुळे पर्यटक वर पर्यंत जाऊ शकतील. सिंहगड किल्ला व आसपासचा परिसर हा पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात (Sinhagad Fort) आसपासचा डोंगर परिसर हिरवगार होतो व अनेक धबधबे वाहू लागतात. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातील लाखो पर्यटक पावसाळ्यात या किलल्यावर वर्षाविहारासाठी येत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.