sangvi Garbage: जुन्या सांगवीतील घाणीचे साम्राज्य दूर

एमपीसी न्यूज: जुनी सांगवी येथील चंद्रमणी चौकातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टॅड (चंद्रमणी नगर) हा मुख्य रस्ता आहे येथे ड्रेनेज चेंबर चोकअप झाले होते. (Sangvi Garbage) त्यातील घाण बाहेर येऊन गाळ साठला होता. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. मात्र आता हे घाणीचे साम्राज्य दुर करण्यात आले आहे.

 

 पावसाळ्यात रिक्षा स्टॅन्ड जवळील चेंबर चोकअप होते व त्यातील घाण बाहेर येऊन दुर्गंधी पसरते. त्याचा त्रास या स्टँडवर थांबणाऱ्या 15 ते 20 रिक्षा चालकांना होतो असं रिक्षाचालक नवाज शेख यांनी सांगितलं. (Sangvi Garbage) रिक्षा चालक प्रकाश पाटील म्हणाले की, आसपासचे रहिवासी दापोडी, नवी सांगवी व इतर ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा स्टॅन्ड वर येतात. या नागरिकांना सुद्धा येथील घाणीचा व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

 

त्यांनी सांगितले की त्यांनी राजू सावळे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना या समस्येबाबत सांगितले. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत येथे स्वच्छता करण्यात आली. ड्रेनेज चेंबर मध्ये रिकाम्या पाण्याच्या, शीत पेयच्या व इतर प्लास्टिकच्या बाटल्या अडकल्याने चोकअप झाले होते. त्या सर्व बाटल्या बाहेर काढण्यात आल्या. तसेच स्टॅन्ड जवळील घाण साफ करून गाळ काढला, कीटकनाशक पावडर फवारण्यात आली. त्यामुळे दुर्गंधी दूर झाली आहे.
सावळे म्हणाले की महानगरपालिकेमार्फत ड्रेनेज चेंबर पावसाळ्यापूर्वीच साफ करायला हवी होती पण ती केली गेली नाहीत. त्यामुळे रिक्षा चालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.