Pune News : मुळा नदीपात्रात सहा महिन्याचे अर्भक सापडले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  :  पुण्यातील संगमवाडी जवळील मुळा नदीच्या पात्रात अंदाजे सहा महिन्याचे पुरुष जातीचे मयत अर्भक सापडले आहे. (Pune News) 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे अर्भक त्या ठिकाणी दिसून आले. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मनोज गंगाधर दिवे यांनी याप्रकरणी तक्रार दिली. 

Pune Crime : हॉटेल मालक आणि वेटरकडून ग्राहकावर जीवघेणा हल्ला

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बोट क्लबच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या मुळा नदीच्या पात्रात 10 डिसेंबर रोजी पुरुष जातीचे मयत अर्भक आढळले आहे.(Pune News) अज्ञात पालकांनी आपले कुकर्म लपविण्याच्या उद्देशाने किंवा अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याला नदीपात्रात टाकून दिले आहे. खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.