Talegaon Dabhade News : रोटरी सिटीच्या महिला दिनाच्या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब तळेगाव सिटी, सिद्धी कम्युनिकेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध उपक्रमांसह जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिर, मोबाईल मधील किरणांमुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून बचाव करणारी संरक्षण चिप व सर्व महिलांच्या मोबाईलला स्क्रीन गार्ड मोफत बसवण्यात आले 1200 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन तळेगाव रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो विलास काळोखे यांच्या शुभहस्ते रोटरी क्लब तळेगाव सिटीचे अध्यक्ष रोटरी राजेश गाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. रो किरण ओसवाल, डॉ उमेश गुट्टे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले

डॉ मोहिते, डॉ महालिंगे,बाबा चोरे,रो संजय मेहता,रो सुरेश शेंडे, रो तानाजी मराठे व रो बाळासाहेब रिकामे, रो शाहीन शेख, रो रेश्मा फडतरे, रो वैशाली खळदे, रो शरयू देवळे हे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो सुरेश दाभाडे यांनी तर आभार प्रदर्शन रो दिपक फल्ले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.