SSC HSC 17 form : दहावी बारावी परिक्षेचा 17 नंबर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

एमपीसी न्यूज – दहावी बारावी परीक्षेला खाजगीरित्या प्रवेश घेणा-या विद्यार्यांना 17 नंबर अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 17 नंबर अर्ज भरण्यासाठी मंडळाने 6 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने याबाबत प्रकटन जाहीर करण्यात आले आहे. 2022 मध्ये होणा-या दहावी बारावी बोर्डाच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत 17 नंबर अर्ज सादर करता येईल. दहावीसाठी 1000 रूपये नोंदणी शुल्क आणि 100 प्रक्रिया शुल्क असेल. तर, बारावीसाठी 500 रूपये नोंदणी शुल्क आणि 100 प्रक्रिया शुल्क असेल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

अर्ज भरण्यासाठी या लिंकवर भेट द्या –

दहावी – http://form17.mh-ssc.ac.in

बारावी – http://form17.mh-hsc.ac.in

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.