Pimpri News : स्वाईन फ्ल्युचे मोफत लसीकरण सुरु करा – विवेक तापकीर

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात स्वाईन फ्ल्यु (H1N1) आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.अद्यापपर्यंत 25 रुग्ण स्वाईन फ्ल्यु (H1N1) आजाराने बाधीत झाले आहेत.वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तातडीने स्वाईन फ्यूचे मोफत लसीचे लसीकरण करून घेण्याची मागणी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे.स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच रूग्ण दगावत पण आहेत.यासोबत कोविड 19 आणि डेंग्यू रूग्नांची भर आहे.आरोग्य व्यवस्था अपूरी पडत आहे.

स्वाईन फ्लूचे वाढते रूग्ण पाहता युद्ध पातळीवर मोफत लसीकरण होणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने महापालिकेने उपाययोजना करावी.लोकांच्या आरोग्याचा विचार करून लसीकरण सुरु करावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.