Police constable recruitment : राज्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु,ऑनलाईन फॉर्म भरताना इच्छुक उमेदवारांना अडचणी 

एमपीसी न्यूज –  राज्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया (Police constable recruitment) सुरु झाली आहे. परंतु  इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

अलिबाग जिल्ह्यासाठी 272 पोलीस शिपाई, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्र 4 नागपूर साठी 54 सशस्त्र पोलीस शिपाई, अकोला जिल्ह्यासाठी 327 पोलीस शिपाई, गोंदिया जिल्ह्यासाठी 172 पोलीस शिपाई, लोहमार्ग औरंगाबाद साठी 108 पोलीस शिपाई, नाशिक ग्रामीण साठी 15 पोलीस शिपाई चालक, वर्धा जिल्ह्यासाठी 90 पोलीस शिपाई, वर्धा जिल्ह्यासाठी 36 पोलीस शिपाई चालक, नाशिक ग्रामीणसाठी 15 पोलीस शिपाई चालक, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयासाठी 521 पॉलिस शिपाई, नाशिक ग्रामीण साठी 164 पोलीस शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

इच्छुक उमेदवार जवळच्या ऑनलाईन फॉर्म सर्व्हिस सेन्टर येथे जाऊन फॉर्म भरत आहेत. मात्र फॉर्म भरत असताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

याबद्दल अंनत पगारे, ऑनलाईन फॉर्म सर्व्हिस सेन्टर चालक म्हणाले की, ‘”सकाळी एका उमेदवाराचा 15 मिनिटात फॉर्म भरून होतो. परंतु साईट बंद पडल्यास 2 – 2 तास साईट चालत नाही. फॉर्म भरण्यासाठी 7 ते 8 स्टेप्स आहेत. प्रत्येक स्टेप संपल्यावर रिफ्रेश करावे लागते. तसेच फोटो अपलोड  व्हायला खूप वेळ लागतो. यामुळे दुपार नंतर एक फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी 2 तासापेक्षा अधिक वेळ लागतो.

CKP Community : कार्ला एकविरा येथे सीकेपी समाजाचा `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा

पगारे पुढे म्हणाले की, “फॉर्म भरण्यासाठी ई-मेल लवकर मिळत नाही. काही वेळेस तर हा ई-मेल दुसऱ्या दुवशी मिळतो. त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या दिवशी येऊन फॉर्म भरावा लागतो. इच्छुक उमेदवारांना तासंतास सेंटरवर बसून रहावे लागत आहे. मर्यादित संगणक उपलब्ध असल्याने एका वेळी एकच उमेदवाराचे काम होते. दुसरया उमेदवारांना आपला नंबर येण्याची वाट पहावी लागते.

ते म्हणाले की, “आत्ताच अशी अवस्था असेल तर शेवटचे 4- 5 दिवस फॉर्म भरायला उरलेले असताना परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. (Police constable recruitment) आत्ताच 4 तास एक फॉर्म भरायला लागत आहे तर त्यावेळेस खूप गर्दी झाल्यास साईट ओपन होण्यास फार वेळ जाऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.