Pimpri News : गुरुद्वारा परिसरातील विविध समस्यांबाबत पालिका आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गुरुद्वारा परिसरातील विविध समस्यांबाबत कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना अध्यक्ष सुरज बाबर यांनी महापालिका आयुक्त आणि ब प्रभाग क्षेत्रीय अधिकारी यांना निवेदन दिले. विविध समस्या सोडविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी चिंचवड येथील नागरिकांना व लहान मुलांना गार्डन नाही. ते उपलब्ध करून द्यावे. गुरुद्वारा चौक ते ममिली कार्यालय/ चंदन स्वीटरोड या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्टाॅर्म वॉटर लाईन टाकावी. गुरुद्वारा परिसरातील ज्या स्ट्रीट लाईट सोडियम वेपर मध्ये असतील त्या एलईडी मध्ये कन्वर्ट कराव्यात जेणेकरून विजेची बचत होईल.

साई हौसिंग सोसायटी, सरोवर हौसिंग सोसायटी, स्वप्ननगरी सोसायटी, भारत माता सोसायटी यांच्या लगत जाणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकून मिळावा / गुरुद्वारा कॉलनी ते राजयोग कॉलनी आरसीसी पाईप टाकून रस्ता करून द्यावा. गुरुद्वारा परिसरातील सर्व सोसायट्यांचे रोड चेक करून डांबरीकरण करावे. गुरुद्वारा चौक ते ममीली कार्यालयामार्गे जाणाऱ्या वालेकरवाडी रोडवर स्ट्रीट लाईट एलईडी बसवाव्यात.

गुरुद्वारा परिसरातील रेल्वे लाईनच्या टनेलखाली वर्षानुवर्ष पावसाळ्यामध्ये पाणी साचत आहे. त्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही, यावर कार्यवाही करावी. गुरुद्वारा परिसरातील सर्व सोसायटींचे सर्वेक्षण करून पावसाळ्यामध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ज्या ठिकाणी पाणी साठत असेल त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बाबर यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.