Pune News : विद्यार्थी ,पालक , शिक्षक आणि शाळा सगळ्यांचीच पंचाईत !

एमपीसी न्यूज : ( हर्षल आल्पे )कोरोंना च्या या तश्या अस्थिर वातावरणात, लॉकडाउन मध्ये गेले दीड दोन वर्ष आपण सगळेच मोठ्या विचित्र परिस्थितीतून जात आहोत . काही वेळा तर या परिस्थितीला कुणाला दोष द्यायचा हेच कळत नाही.

राजकीय परिस्थितीला दोष द्यावा म्हंटलं तर ते काही करायला गेले तर पुन्हा संख्या वाढीचा धोका असतो , तर मेडिकल यंत्रणे ला दोष द्यावा तर त्यांच्या समस्या अजून च वेगळ्या , अश्या वेळी होत असलेली भीषण परिस्थिति , त्याची जवाबदारी कुणीच घेत नाहीये . खाजगीत  जो तो दुसर्‍याला तरी दोष देतो नाहीतर नशिबाला तरी !!!!!

काही तज्ञ ज्योतिष पंडितांशी बोलल्यावर ते मान्य करतात, की ज्योतिष शास्त्र ही काहीवेळा या कोरोंना च्या संक्रमण काळापुढे फेल ठरते. अश्यावेळी अचूक होकारात्मक भविष्यवाणी ची आशा ही मावळते, या सगळ्यात एक प्रश्न सारखा सतावतो, की आज शिक्षण घेणार्‍या मुलामुलींचे भविष्य काय ? येणार्‍या त्यासंबंधीच्या बातम्या चिंताजनक च आहेत.

काही प्रसार माध्यमांच्या खर्‍या खोट्या बातम्या वाचल्यावर असे लक्षात येते, की कंपन्या आता नोकर्‍या देताना 2020-21 उत्तीर्ण झालेल्या पदवीधर किवा उच्च पदवीधराना सोडून आधीच्याना प्राधान्यक्रम देण्याचा विचार करीत आहेत, असे जर झाले तर व्यवस्थे पुढे खूप मोठा प्रश्न भविष्यात वाट बघत आहे , खर तर जे आत्ता पदवीधर किंवा उच्चपदवीधर झाले असतील त्यांचा दोष नाहीये ? हिंदीत ल्या फिल्मी संवादाचा आधार घ्यायचा झाल्यास “दोष न तेरा है, न ही मेरा है, दोष तो हालात का है, जिसने हमे बरबादी की और धकेल दिया है !” हेच त्या मुलांच्या प्रश्नाचे उत्तर येते .

जसा त्या मुलामुलींचा प्रश्न तसाच शाळेत जाणार्‍या मुलामुलींचा ही आहेच की , तो जो काही शाळेतला निरागसपणा होता, तो संपून जातो की काय ? अशी भीती आज समाजात पाहिल्यावर दिसते, हसणे, खिदळणे, बागडणे सोडून कसली तरी अनामिक भीती या मुलांच्या चेहेर्‍यावर दिसते, एका बंद खोलीत लॅपटॉप समोर किंवा मोबाइल समोर तास न तास बसून राहणे,

40 मिनिटे सलग त्या स्क्रीन वर च्या एवढ्याशा शिक्षकाकडून ज्ञान घेणे त्यांच्या  वयासाठी फार च अवघड आहे, शाळेतला मुलामुलींचा शिक्षकांशी असलेला वैयक्तिक संवाद, ते नात संपते आहे की काय ? अशी भीती ज्यांनी शाळा , महाविद्यालय भरभरून एन्जॉय केले आहे त्यांना वाटते ..

ह्याच भीतीत अजून एका भीतीची भर पडते , ती म्हणजे एका मानसशास्त्रीय कारणाची , ती म्हणजे पालकांच्या मनोभूमिकेचा मुलांवर थेट परिणाम हा होत असतोच असतो, एखाद वेळी पालकांची चिडचिड होत असेल तर त्या घरातील मुला मुलींवर , त्यांच्या मानसिक आणि शाररिक आरोग्यावर याचा परिणाम होतो , हे शास्त्रीय दृष्ट्या झालेल निरीक्षण आहे.

आज पालक च स्वत: इतकी अस्थिरता अनुभवत असताना त्याचा परिणाम मुलांवर होत असणारच , सतत बदलत जाणार्‍या नोकर्‍या आहे. त्या पेक्षा कमी पगारावर करावे लागणारे मन मारून काम , बेरोजगारीची भीती, उपासमार, या सगळ्याचा घरी परिणाम हा होतोच होतो , मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा ? हा प्रश्न समाजात जास्ती जास्त पालकांना पडला आहे. ज्याचे उत्तर अवघड आहे ,एवढाच पर्याय येतो.

पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही समस्या तर शिक्षकांची ही वेगळीच समस्या, पगारात कमी तर त्यांच्या पण आहेच, त्यात पुन्हा ऑनलाइन शिक्षण पद्धतीत नव्याने काही गोष्टी आत्मसात करण्यापासून तयारी, त्यात वर्गा पेक्षा ऑनलाइन मध्ये जास्त दक्ष राहण्याची जवाबदारी, त्यात पुन्हा हे भान ठेवा, की मुले घरी आहेत, ते त्यांचे मन मारून एका जागी बसवलेली आहेत.

त्यांचे लक्ष आपल्यावर खिळवून ठेवण्याची जवाबदारी सगळ्यात अवघड शिक्षकांवर च आहे , 40 मिनिटांच्या तासाआधी त्याची तयारीच जास्त करावी लागते, मुले फिजिकली शाळेत येत नसली तरी शिक्षकांना मात्र शाळेत कामकाज करण्यासाठी यावेच लागते, जिवाची रिस्क ही त्यांना ही आहेच की . तरी ही आपले कर्तव्य ओळखून ते शाळेत येतात, तसा आजच्या काळात शिक्षकी पेशा हा थॅंक लेस जॉब झाला आहे . तरी ही कोणी काही न बोलता आपले काम करीत आहेत, त्यात आनंद शोधत आहेत .

शिक्षकांचे दुख्ख पाहिल्यावर शाळा ही फार काही सुखी आहे अशातला भाग नाही, काही शाळांना तर दैनदिन खर्च भागवणे ही मुश्किल झाले आहे, शाळा आहे त्या स्वरुपात व्यवस्थित ठेवण्यासाठी ही खर्च आहेच , शाळा पुन्हा सुरू झाल्यावर मुलांच्या आरोग्याचा विचार करून काही गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करणे हेच सगळ्यात मोठे आव्हान आहे, त्यात पुन्हा पालकांच्या अस्थिर परिस्थितिमुळे होत असलेली फी कमी ची मागणी लक्षात घेतली, तर एकूण च शाळांसाठी आव्हानात्मक परिस्थिति आहे .

या सगळ्यावर योग्य वेळी, लवकरच मार्ग काढण्याची गरज आहे, नाहीतर परिस्थिति हाताबाहेर जाईल, कोरोंना तून लोकांना बाहेर काढायचे आहे, मान्य, पण, परिस्थिति सुरळीत करण्यासाठी सगळ्या सरकारांनी  जलद पाऊले उचलायची आज गरज आहे, राजकारण आपल्या जागी, मात्र लोकांना आणि समाजाला देशोधडीला लागण्यापासून सर्वांनाच वाचवायचे आहे, हे ही आपलेच काम आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.